अमरावती जिल्ह्यातील लॉकडाउनवरून पालकमंत्री व खासदार यांच्यात आरोप प्रत्यारोप !!

0

अमरावती (प्रतिनिधी) :  अमरावती शहरात कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव हा मोठ्या संख्येने वाढत आहे . मंगळवारी जिल्ह्यात 926 रुग्ण बुधवारी 802 रुग्ण आढळून आले व दहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या अपयशी ठरल्या असून . अपयश लपवण्यासाठीच  पालकमंत्र्यांनी एक आठवड्याचा लाॅकडाऊन अमरावती आणि अचलपूर या गावामध्ये लावला

मात्र हा लोक डाऊन पूर्णपणे  चुकीच्या मार्गाने लावण्यात आला असल्याचा आरोप जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे . अमरावती शहरात गेल्या आठवड्याभरा पासून कोरोना  रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे . या रूग्णांवर आळा बसविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे . कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू नये याकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी 20 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात संचारबंदी लावली होती . मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी इतर कोणत्याही जनप्रतिनिधी ना विश्वासात न घेता . अमरावती व अचलपुर तसेच मनपा क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये एक आठवड्याची संचारबंदी घोषित करून टाकली.

 

ही संचारबंदी आपले अपयश लपविण्यासाठी लावली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे . या लाॅकडाउन मुळे दररोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या नागरिकांचा विचार पालकमंत्र्यांनी का केला नाही ? असा प्रश्नही खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला . लॉक डाऊन च्या याकाळात महावितरणचे पथक ज्याचे विज बिल जास्त आहे अशा नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्याचे काम करीत आहे  . अशांवर ही आपण नियंत्रण आणायला हवे होते मात्र ते न करता . जिल्ह्यात लाॅकडाऊन लावण्यात आला . हे सरासर चुकीचे असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन व संचार बंदीचा निर्णय घ्यावा लागला . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून व त्यांच्या निर्देशानुसार केवळ अमरावतीचं नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे .

 

सध्यास्थितीत कोरोनाची साथ रोखणे हे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य असून . लाॅकडाऊन चा निर्णय नागरिक व समाजाच्या सुरक्षिततेसाठी  घेण्यात आला आहे . असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालक मंत्री  ऍड यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले . फेब्रुवारी मध्ये गत 23 दिवसात अमरावती जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक बाधित आढळले . त्यापूर्वी गत सप्टेंबर मध्ये बाधितांची संख्या सर्वाधिक होती. आता फेब्रुवारी मध्ये हे प्रमाण त्याहूनही मोठे आहे . असे सांगून पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन. कोरोना ची साखळी तोडण्यासाठी निर्णय झाला . पूर्वीच्या लाॅकडाऊन कालावधी पेक्षाही आता अधिक बाधीत आढळत असल्याने . लाॅकडाऊन व संचार बंदी शिवाय पर्याय उरला नाही . त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन . ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळले आहेत . तिथे लॉकडाउन व संचार बंदी करण्याचा निर्णय घेतला . पश्चिम विदर्भात बाधितांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन शासनाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी . अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, , यवतमाळ या पाचही जिल्ह्यात संचारबंदी लागू केली  आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.