अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी

0

पारोळा (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमातून अभिनेता सुशांत सिंह राजपूतने नक्की आत्महत्या केली की कोणी त्यांचा खुन केला ही शंकाच असुन आत्महत्याच केली असेल तर का केली? व कोणाच्या दबावाने केली आणि खुन केला तर कोणी केला व का केला याच्या स्पष्टपणे छडा लावणे गरजेचे आहे.

सुशांत सिंह राजपूत हा राजपूत समाजाचा असल्याने बॉलीवूडमध्ये त्याच्या द्वेष केला जात होता काय? या सर्व बाबींचा उलगडा होणे गरजेचे असून त्याची सीबीआय चौकशी झाल्यावरच होईल असा आम्हाला विश्‍वास असुन त्यांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आमच्या श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेकडून केली जात असून आपण आमची मागणी प्रशासना मार्फत शासनापर्यंत पोहोचावे असे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष महाराष्ट्र्र प्रदेश श्री बाळासाहेब पाटील, दीपक चतुर गिरासे, रामचंद्र महादू पाटील, योगेश बाळासाहेब पाटील, शालिक पाटील,राजेंद्र राजपूत,प्रवीण पाटील,नंदू राजपूत,हरसिंग पाटील, आदींनी तहसीलदार अनिल गवांदे,यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.