अपघातात मयत रेल्वे कर्मचाऱ्याच्या परिवाराला रेल्वे प्रशासनातर्फे तातडीची मदत

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ  येथे दि 1 नोव्हेंबर रोजी रेल्वे कर्मचारी लिलाधर रामसिंग चौधरी ह्या रेल्वे कर्मचाऱ्याचे ऑन ड्यूटी रेल्वे खाली आल्याने अपघाती निधन झाले होते.त्यांच्या परिवाराला रेल्वे प्रशासनातर्फे तातडीची मदत देण्यात आली, दोनच दिवसात त्यांना सेटलमेंट ड्यूज आणि पेन्शन पे ऑर्डर देण्यात येऊन त्यांच्या मुलास (रंजित) यास अनूकंपा आधारावर रेल्वेत एम ओ एच शेड मध्ये टेकनीशियन 3 या पदावर मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते नोकरी दोन दिवसात देण्यात आली. याकामी वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही एस वडनेरे,मुख्य कर्मचारी कल्याण निसाक्षक आर पी झनके व इतर कल्याण निरीक्षक सह रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीश्नम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.