अखेर ‘शालीमार’ थिएटर आजपासून होणार सुरू!

0
‘तान्हाजी’ चित्रपटाने होणार थिएटरचा शुभारंभ
सुनिल बोदडे
बोदवड – संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले शालीमार थिएटर १ जुलै पासून बंद होते.रसिकांना पाठ फिरवल्याने,अपेक्षित व्यवसाय आणि उत्पन्न होत नसल्याने थिएटर बंद अवस्थेत होते.
मात्र हे थिएटर नव्याने सुरू होणार असून बोदवड शहरातील शालिमार टॉकीज नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून येत्या दोन दिवसांत म्हणजे दि.१७ शुक्रवार रोजी तान्हाजी चित्रपटाने थिएटरचा शुभारंभ करण्यात येत आहे.
सन १९९७ मध्ये बोदवड रेल्वे स्टेशन रोडवर अत्याधुनिक आणि प्रशस्त असे हे शालीमार थिएटर असून मोठ्या दुरदृष्टीने या शालीमार टॉकीजची निर्मीती केली असून ५०० आसानसंख्या असलेल्या या आधुनिक थिएटर मध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून,जळगाव जिल्ह्यात ‘नंबर वन’ चे थिएटर म्हणूनही शालीमार टॉकीजचा नावलौकिक आहे.मात्र सिंगल स्क्रिन थिएटर्संना अलीकडे राज्यभरातून वाईट दिवस आले आहेत.त्यातून शालीमार सुध्दा सुटले नव्हते.
बोदवड रेल्वे स्टेशन रोडवर ३० हजार स्क्वेअर फूटच्या प्रशस्त जागेत ही शालीमार टॉकीज उभी असून टॉकीजच्या दर्शनी भागात सुंदर असा बगीचा तयार केला आहे.त्यामुळे टॉकीजच्या आवारात शिरतांनाच सिने चाहत्यांना एक आल्हादक अनुभव येतो.मात्र गेल्या काही दिवसांपासून या थिएटरला घरघर लागली होती.सध्या आँनलाईनचा – इंटरनेटचा जमाना असल्याने व प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असल्याने सिंगल स्क्रीनकडे प्रेक्षक पाठ फिरवीत आहे.त्यामुळे अनेक सिनेमागृह बंद पडल्याचे वास्तव आहे.त्यातून शालीमार सुध्दा सुटले नव्हते हे थिएटर १ जुलै पासून बंद ठेवण्याचा निर्णय तत्कालीन संचालक यांनी घेतला होता.
त्यामुळे बोदवड येथील शालीमार थिएटरचे संचालक अमृत पटेल व सुभाष चौधरी यांनी सिने चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन हे थिएटर नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसांत म्हणजे १७ जानेवारी शुक्रवार रोजी या थिएटरचा ‘तान्हाजी’ या चित्रपटाने शुभारंभ
होत असून येत्या शुक्रवार पासून  प्रेक्षकांना पुन्हा या थिएटर मध्ये सिनेमांची मेजवानी मिळणार आहे.
सिने चाहत्यांना भावना लक्षात घेऊन हे थिएटर सुरू व्हावे अशी अपेक्षा ‘लोकशाही’ने प्रकाशित केलेल्या बातमीतून व्यक्त केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.