रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘ या ‘ गाड्यांच्या मार्गात बदल तर काही गाड्या रद्द

0

 

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

बिलासपूर विभागातील रेल्वेने २४ जूनपासून ब्लॉक घेतल्याने संत्रागाची – पुणे – संत्रागाची, भुवनेश्वर- एलटीटी- भुवनेश्वर, दोन्ही बाजूची आझादहिंद एक्स्प्रेस, शालीमार एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल 

हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेस ही गाडी २४ ते २९ जूनपर्यंत झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल. मुंबई- हावडा गीतांजली एक्स्प्रेस २८ जून ते १ जुलैपर्यंत, हटिया – पुणे एक्स्प्रेस २४ व २८ जून, पुणे – हटिया एक्सप्रेस २६ व ३० जून, पोरबंदर शालीमार एक्स्प्रेस २६ व २७ जून आणि शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस २८ व २९ जून असे दोन दिवस झारसुगुडा, टिटलागड, रायपूर मार्गे वळवली जाईल.

या गाड्या रद्द
संत्रागाची-पुणे एक्स्प्रेस २९ जून, पुणे- संत्रागाची एक्स्प्रेस १ जुलै, भुवनेश्वर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २४ व २७ जून, एलटीटी- भुवनेश्वर एक्स्प्रेस २६ त २९ जून, हावडा – पुणे आझादहिंद एक्सप्रेस २७ जून व २ जुलै, पुणे – हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस २७ जून व २ जुलै, एलटीटी-शालिमार २४ व २९ जून आणि शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस २६ जून व १ जुलैला रद्द केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.