मोठा दिलासा ! ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती झाल्या कमी

या औषधांच्या किमतींत घट

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात मधुमेह, हृदय आणि कानाच्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्स इत्यादींचा समावेश आहे.

अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा हा निर्णय नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी च्या (एनपीपीए) १२४ व्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान, एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते, ज्याचा वापर सामान्य लोक करतात. बैठकीत ५४ औषधं फॉर्म्युलेशन आणि ८ विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा करोडो लोकांना होणार आहे.

या औषधांच्या किमतींत घट

या बैठकीत एनपीपीएने निश्चित केलेल्या ५४ औषधांच्या किमतींमध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एनपीपीएने या बैठकीत ८ विशेष फीचरच्या उत्पादनांच्या किमतींवर निर्णय घेतला होता.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.