मागण्या मान्य न झाल्यास बिढ्यार आंदोलन..!

एकलव्य संघटनेचे विविध मागण्यांसाठी निवेदन

0

 

भडगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा बेमुदत बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन भडगाव तालुक्यातील एकलव्य संघटनेच्या वतीने भडगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

 

आंदोलनातील मागण्या खालील प्रमाणे

  • १. भडगाव शहरातील यशवंतनगर टोणगाव, पेठ, कराब, वडधे या भागातील भिल्ल समाज बांधवांचे मंजूर घरकुल सिटी सर्वेच्या मोजमाप मुळे आदिवासी बांधवांचे बहुल वस्ती म्हणून नगरपरिषद मार्फत मोजमाप करून जागा नावे करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा व जे लोक पिढ्‌यानपिढ्या राहत आहेत त्या जागा त्यांच्या नावे करण्यात याव्यात.
  • २. भडगाव शहरातील वरची पेठ, यशवंत नगर, कराब वडघे, टोणगाव या भागातील भिल्ल बांधवांची दफनभूमी नावे करण्यात यावी.
  • ३. ग्रामीण भागातील भिल्ल समाज बांधवांना प्रधानमंत्री आवास व शबरी घरकुल योजनेसाठी नमुना नंबर ची अट रद्द करून आदिवासी मिल बांधव राहत असलेल्या जागेवरच घरकुल बांधून देण्यात यावी.
  • ४. ग्रामीण भागातील आदिवासी दफन विधी करताना ती जागा आदिवासी मिल्ल दफनभूमी म्हणून नावे करून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यात यावी.
  • ५. भडगाव येथे आदिवासी विकास विभागामार्फत जळगाव लोकसभेसाठी स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालय करण्यात यावे.
  • ६. आदिवासी भिल्ल बांधवांसाठी नवीन रेशन कार्डासाठी लागणाऱ्या जाचक अटी रद्द करून सोप्या पद्धतीने नवीन रेशन कार्ड देऊन त्यांना अन्नसुरक्षा देण्यात यावी, ज्या आदिवासी बांधवांकडे केसरी कार्ड आहे त्यांना त्वरित धान्य सुरु करण्यात यावे
  • ७. आदिवासी भिल्ल समाजाला जातीच्या दाखल्यासाठी जाचक अटी आहेत त्या रद्द करून घरपोच जातीचा दाखला देण्यात यावा.
  • ८. आदिवासी भिल्ल समाजातील ऊसतोड शेतमजूर बांधवांना वीटभट्टी मजूर, गवंडी मजूर या मजुरांना दरमहा तीन हजार रुपये देण्यात यावे.
  • ९. आदिवासी भिल्ल समाजाचे दैवत भगवान एकलव्य यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कोणत्याही परवानगी अथवा आचक अट रद्द करण्यात यावी
  • १०. ग्रामीण व शहरी भागातील ज्या आदिवासी भिल्ल बांधवांनी गावठाण जमीन कसत आहे त्या जमिनी कसत असलेल्या आदिवासी भिल्ल बांधवांच्या नावे करण्यात यावी.

या सर्व मागण्या साठी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत बि-हाड आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी ही आग्रहाची विनंती, अशा विविध मागण्याची निवेदन देण्यात आले.

यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, जिल्हा सचिव दादाभाऊ बहीलम, तालुका अध्यक्ष दशरथ मोरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.