नवलच : माणसांसह रस्त्यावर चालताहेत चक्क मगरी..

नदीचे पाणी रस्त्यावर : मगरीचा रस्त्यावरच कॅटवॉक

0

 

रत्नागिरी | 

 

हवामान विभागाने राज्यात जोरदर पावसाचा इशारा दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पावसामुळे कोकणातील नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मगर रस्त्यावर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दरम्यान चिपळूनमधील चिंचनाका परिसरातील मगर रस्त्याने फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र ते केरळ दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरु असून दक्षिण कोकणाला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

 

चिपळूणमध्ये मगरीचा चक्क मुक्त संचार रस्त्यावर पाहायला मिळाला. चिंचनाका परिसरातील हे दुष्य खूप व्हायरल झाले आहे. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या नदीत असणाऱ्या मगरींचा वावर आता रस्त्यांवर होत आहे. रविवारी रात्री चिंचनाका येथे एक मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पहिल्यानंतर वाहन धाराकांची देखील चांगलीच बोबडी वळली. त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले गेले.

 

व्हिडिओमध्ये रस्त्यावरुन थाटात मगर चालताना दिसत आहे. या मगरीच्या शेजारुन एक रिक्षावालाही जात आहे. तो आणि इतर काही जण त्या मगरीचा व्हिडिओ काढत आहेत. यापूर्वी मागील वर्षी चिपळूनमध्ये रस्त्यावर मगर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असते. या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.