संत सद्गुरू ह.भ.प. प्रसाद महाराजांच्याहस्ते भडगाव महाविद्यालयात वृक्षारोपण

0

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा व सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भडगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थान, अमळनेर येथील पंढरपूर जाणारी पायीवारी भडगाव येथील लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय या ठिकाणी दि. 25 जून रोजी मुक्कामी होती.

त्यादिवशी गिरणा नदीच्या पात्रात संत सद्गुरू ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या वारीचे सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. दि. 26 जून रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून वारीसाठी मदत म्हणून परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पाचोरा महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या वतीने 800 केळीची पाने पायीवारी दिंडीसाठी देण्यात आले.

कबचौउम विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रो. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी व विद्यापीठाचे रासेयो संचालक मा. डॉ. सचिन नांद्रे यांच्या संकल्पनेतून ‘हरित वारी, निर्मल वारी, स्वच्छ वारी, स्वस्थ वारी अभियान (निसर्गवारी), प्लॅस्टिक मुक्त व तंबाखू मुक्त शरीर अभियान हा संदेश रासेयो स्वयंसेवक-स्वयंसेविकांकडून वारकरी व भडगावकरांना देण्यात आला. कार्यक्रम स्थळी स्वयंसेवकांनी स्वच्छतेसोबतच पायीवारीतील वारकऱ्यांना पंगतीत प्रसाद वाढण्यास सहकार्य केले व दिंडीत सहभाग घेतला.

यानंतर सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयात कबचौउम विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व पा. ता. सह. शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या संकल्पनेतून अमळनेर येथील संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थानचे गादीपती संत सद्गुरु ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, विद्यापीठाचे रासेयो संचालक मा. डॉ. सचिन नांद्रे, कबचौउमवि सिनेट सदस्य ॲड. अमोल पाटील, ज्येष्ठ संचालक नानासाहेब विजय देशपांडे,भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे, रासेयो पारोळा विभागीय समन्वयक प्रा.वाय.बी. पुरी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी प्रा सुरेश कोळी,डॉ. एस. डी. भैसे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. वळवी,(पाचोरा )रासेयो कार्यक्रम अधिकारी ( भडगाव )डॉ. बालाजी पाटील, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना टेमकर, डॉ. ए.एन.भंगाळे, डॉ. एस.जी. शेलार, डॉ. देवेंद्र म्हस्की,डॉ. चित्रा पाटील, डॉ. बी.एस.भालेराव, डॉ. सचिन हडोळती कर, प्रा.शिवाजी पाटील, डॉ.जे.जे. देवरे, डॉ. इंदिरा लोखंडे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्म चारी,रासेयोचे 40 स्वयंसेवक स्वयंसेविका कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.