भडगाव शहरावर राहणार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची नजर

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव पोलीस स्टेशनला कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तसेच अनुचित घटना, गुन्हे घडण्यास प्रतिबंध लागावा. यासाठी भडगाव शहरात ठिकठिकाणी चौकात म्हत्वाच्या २३ ठिकाणी एकुण ४४ सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. याकामी खा.उन्मेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कार्यक्रम सन २०२२,२०२३ योजनेअंतर्गत सीसी टीव्ही कॅमेर्यांसाठी १० लाखांचा निधी मंजुर आहे. तर उर्वरीत खर्चासाठी नगर परीषदेच्या फंडातुन रक्कम खर्च टाकण्यात येणार आहे. या कामाचे ई टेंडर झाल्यानुसार प्राप्त झालेल्या टेंडरमध्ये अंदाजपञकानुसार मंजुर झालेले आहे. या कामाला अंदाजपञकानुसार एकुण २८ लाख ९७ हजार ७२१ रुपये खर्च अपेक्षीत आहे.

या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. जळगावच्या शुवर टेक एजन्सीला या कामाचे टेंडर मिळाले आहे. या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. अशी माहिती भडगाव नगर परीषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली. शहरात सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसविण्याची वारंवार मागणी होत होती. अखेर प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे भडगाव शहरात सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शहरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. शहरात सीसी टीव्ही कॅमेरा यंञणा सुरु करावी. अशी मागणीही शहरातील नागरीकातुन होतांना दिसत आहे. भडगाव शहरातील बसविलेल्या कॅमेर्यांसाठीचे कंट्रोलरुम पोलीस स्टेशनमध्ये राहणार आहे. त्यामुळे शहरात घडणार्या घटनाक्रमांवर पोलीस स्टेशनचे नियंञण राहणार आहे. सीसी टीव्ही कॅमेर्यांची भडगाव शहरात २४ तास निगराणी राहणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. तसेच शहरात होणार्या चोर्या, तसेच मालाविरुद्धचे गुन्हे रोखण्यास पोलीस प्रशासनास मदत होईल. गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस प्रशासनास मोठी मदत होईल. शहरात सीसी टीव्ही कॅमेरे जोडले गेल्यावर पोलीस स्टेशनला कंट्रोलरुमला सी सी टीव्ही कॅमेर्याचे फुटेज राहणार आहेत. त्यामुळे शहरात घडणार्या घटनाघडामोडींवर, वाहतुकीस,अवैध वाहतुकीस, दादागीरी, वादावादीकरणारे,छेडछाड करणार्या रोडरोमीयोंवरही पोलीस स्टेशनचे कॅमेर्याँमुळे नियंञण राहील. परीणामी बहुतांश गोष्टींना आळा बसणार आहे. गुन्हयांचे प्रमाणही कमी होईल. असेही नागरीकातुन बोलले जात आहे. शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरुच होता. शहरात सीसी टिव्ही कॅमेर्यांची २४ तास निगराणी राहणार आहे. तरी सर्व नागरीकांनी कायदयाचे परीपुर्ण पालन करावे. असे आवाहनही भडगाव पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.

२३ ठिकाणी बसविण्यात येणार ४४ सी.सी. टी.व्ही.कॅमेरे

भडगाव शहरातील हद्दीत ठिकठिकाणी २३ चौकात एकुण ४४ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यात पाचोरा चौफुली, पारोळा चौफुली, पुष्पदीप मार्बल, कन्याशाळा कोठली रोड, पेठ चौफुली, मेनरोड(पोलिस स्टेशन समोर), आझाद चौक, नगरदेवळा दरवाजा, मरकज मस्जीद, टोणगाव चौफुली, राज हाॅटेल काॅर्नर, मारुती मंदीर यशवंतनगर, शिवनेरी गेट, बाळद रोड, छञपती संभाजी महाराज डोक्राॅ हाॅल काॅर्नरजवळ, एकविरानगर बाळदरोड काॅर्नर, श्रीराम नगर बाळदरोड, साईमंदीर बाळद रोड, चाळीसगाव रोड ग्रीनपार्क, भवानी बाग दुध डेअरीजवळ, काकासट चौक, सौ. सु. गि. पाटील महा विदयालय, जागृती चौक, मारुती मंदीर , शनीचौक या प्रमुख ठिकठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अशी माहिती भडगाव पोलिस स्टेशनचे गोपनीय विभागाचे स्वप्निल चव्हान, विलास पाटील यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.