राज्य सरकारचा वारकऱ्यांना मोठा दिलासा

या तारखेपर्यंत टोल माफी

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेवून दिलासा दिला आहे. .आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचा जीआरही काढण्यात आला आहे.

आजपासून म्हणजेच तीन जुलैपासून ते 21 जुलै पर्यंत वारकऱ्यांसाठी टोल माफी केली जाणार आहे. राज्य सरकारने यासंबधीचा जीआर काढला आहे. अक्षय महाराज भोसले यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिले आहेत. त्यासंबधीचा जीआर देखील काढण्यात आला आहे.

राज्यभरातील वारकऱ्यांना विठूरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पंढपुरला जातात. अशातच राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.