६ एप्रिल रोजी चेट्री चंड्र भगवान झुलेलाल यांची जयंती

0

पारोळा (अशोक लालवानी) :- सालाबाद प्रमाणे या वर्षी ही भगवान झुलेलाल याची जयंती चेट्री चंड्र ( सिंधी दिवस ) चैत्र शु १ पाडव्याच्या दिवशी आज दि .६ एप्रिल २०१९ शनिवार रोजी समस्त सिंधी समाजा मार्फत मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देश विदेशातील सिंधी बांधवा हा सण मोठया श्रध्देने व पंरपरेने साजरा करतात भगवान झुलेलाल वरुण देवता म्हणुन ही ओळखले जातात. या दिवशी झुलेलाल देवतेची मनोभावे पुजाअर्चा करून संपुर्ण जगात सुख शांती लाभो व सर्वी कडे भरपुर पाणी पाऊस पडुन चोहीकडे हिरवड होवो अशी आराधना सिंधी समाज मार्फत करण्यात येते संपुर्ण विश्वाचे कल्याण हो व संपुर्ण जगात सुख शांती नांदो अशी अरदास पल्वव ( झोळी करून प्रार्थना करणे ) करण्यात येते.

या दिवशी संपुर्ण सिंधी समाज बांधव आपआपले व्यवाहर दुकाने बंद ठेऊन संपुर्ण दिवस झुलेलाल देवते ची मनोभावे पुजाअर्चा करतात व सामाजिक कार्यही या दिवशी मोठया प्रमाणात केले जातात ज्यात प्रमुख्याने रक्तदान शिबिर अन्न वस्त्रदान बहुतेक ठिकाणी आमभंडारा करण्यात येतो. तसेच सांयकाळी भव्य मिरवणुक काढुन आयोलाल झुलेलाल च्या जयघोष देऊन संपुर्ण शहरभर मिरवणुक निघते ज्यात भगवान झुलेलाल यांची मोठी प्रतिमा फोटो व अंखड पवित्र ज्योत (बाहाराणा साहेब) एका गाडीत ठेउन आयोलाल झुलेलाल ज्योतुन वारो उडेरोलाल चा जयघोष संपुर्ण मिरवणुक मार्गात केला जातो. याच दिवशी पारोळा शहरात ही सिंधी समाजा कडुन हा सण मोठया उत्साहात साजरा होणार आहे समस्त समाज बांधवानी उपस्थित राहाण्याचे आवाहन जय झुलेलाल सिंधी पंचायत तर्फे समाज अध्यक्ष अशोककुमार लालवाणी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.