सत्तेचा उपभोग घ्यायचा असेल तर गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक

0

पुढील निवडणुकांसाठी सज्ज व्हा

भडगांव (प्रतिनिधी) : खर्या अर्थाने सत्तेचे फळे चाखायची असतील तर घराघरात शिवसेनेच्या सभासदांची नोंद करा.आणि मगच येणाऱ्या सर्व निवडणुकिंना सामोरे जा म्हणजे यश हमकास येईल. अशा सुचना वजा अवाहन आज दि.१० रोजी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी केले..

 

शिवसेना सभासद नोंदणी आणि भडगांव तालुक्यातील असंख्य ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम लागला आहे.त्याचप्रमाणे कोरोणाच्या वाढत्या प्रभावामुळे भडगांव नगरपालिकेचा स्थगीत झालेला निवडणुक कार्यक्रम केव्हाही लागु शकतो या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत भडगांव येथील “शिवतिर्थ” शिवसेना कार्यालयात तालुका शिवसेना युवासेना पदाधिकार्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते..

 

ते पुढे म्हणाले कि,पक्षाशी जो एकनिष्ठ राहिल जो पक्षाशी ईमान राखून काम करेल त्याला यश मिळाल्या शिवाय राहत नाहि म्हणून पक्षवाढीसाठी आपण सदैव प्रयत्न केले पाहिजे आणि घर तिथे शिवसैनिक अभियान राबवून गावा खेड्यात जाऊन जास्तित जास्त शिवसैनिक सभासदांची नोंद करावी ..त्या नंतर गावातील कोणतीहि निवडणूक कठिण जाणार नाहि आणि आपण सगळ्यांना सत्तेची फळे चाखायला मिळतील गल्ली पासून मुख्यमंत्री प्रयंत सत्ता आपली आहे त्या सत्तेचा उपयोग आपल्या शहराचा..गांवाचा..खेड्याचा विकास करण्यासाठी अपणास जरुर होईल यात शंका नाहि आसेही त्यांनी शेवटी सांगितले .याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी ,जि.प चे मा.सभापती विकास पाटील,मनोहर चौधरी,माधव राजपूत,गोरख पाटील यांनी संघटना बांधणी संदर्भात थोडक्यात आपली मनोगते व्यक्त केले.

 

या वेळी बापुजी फाॕन्डेशनचे लखिचंद पाटील तसेच मा.नगरसेविका समिक्षा पाटील यांच्या वतिने नविन वर्षासाठी दिनदर्शिका वाटप करण्यासाठी आमदार पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.जे.के पाटील यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी व्यासपिठावर आ.किशोर पाटील,उपजिल्हाप्रमुख गणेशा परदेशी ,ता.प्रमुख विलास पाटील,शहर प्रमुख योगेश गंजे,ईम्रान सैय्यद,युवासेनेचे लखिचंद पाटील,रविंद्र पाटील,निलेश पाटील,माधव राजपुत,भैय्या राजपुत. शेतकरी संघाचे चेअरमन प्रताप पाटील,विकास पाटील,युवराज पाटील,जि.प.सदस्य भुरा पाटील,चित्ते सर,शशीकांत येवले,डाॕ.प्रमोद पाटील,जगन भोई,संतोष महाजन ,सतिष पाटील ,अनिल पाटील,गोरख पाटील,विश्वास पाटील,आसीमभाई,कदिर,युनुस भाई,देविदास पाटील,आनिल पवार,भाउसाहेब भोसले ,देवा अहिरे आदीसह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.