शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन विहीर नोदणीसह बोड अळीचे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी

0

चाळीसगाव (प्रतिनिधी)   राज्य सरकार च्या वतीने मुख्यमंत्री सौर पंप योजना शेतकऱ्यांसाठी राज्यभर राबवली जात आहे. मात्र तहसील स्तरावरील तलाठी ऑनलाईन सातबाऱ्यावर विहीर नोंदणी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. म्हणून आपल्या स्तरावरून तालुकास्तरीय तहसीलदार यांना सूचना करून तात्काळ शेतकर्‍यांच्या सातबाऱ्यावर ऑनलाइन विहीर नोंदणी करण्यात यावी. तसेच बोंड आळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी.यासाठी जिल्हाधिकारी यांना रयत सेनेच्या वतीने दि २ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शेती पंपाला  दिवसा वीजपुरवठा सुरळीत होत  नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जाऊन पाणी भरावे लागते त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतू शकते .तलाठ्यानी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ऑनलाईन विहीर नोंदणी केल्यास सौर ऊर्जा पंपाचा लाभ  शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांना  विजेची गरज भासणार नाही . आणि दिवसा शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यास मदत होईल .रात्री बेरात्री शेतात जाण्याची गरज भासणार नाही.म्हणून तलाठ्याना शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ऑनलाईन विहीर नोंदणी  करण्यास तात्काळ सूचना कराव्यात .

तसेच यावर्षी प्रजन्यमान  जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यां चा कापूस खराब होऊन बोंड आळी चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  जिल्ह्यातील तहसीलदार यांना सूचना करून बोंड अळीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई  देण्यात यावे.असे न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर  रयत सेनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन पुकारण्यात येईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जिल्हाधिकारी यांची जबाबदारी राहणार असल्याचे रयत सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि २ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,शेतकरी सेनेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील,एरंडोल तालुका अध्यक्ष संजय शिंदे ,जळगाव महानगराध्यक्ष योगेश कदम,मा जि प सदस्य बाबुलाल चव्हाण, ज्ञानेश्वर पवार,  आनंदा मराठे , सुरेश पवार ,मनीष राजे यांच्या सह्या आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.