जामदा उजवा व डावा कालवा, पाटचार्या दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरु

0

भडगाव (सागर महाजन) :  जामदा गिरणा उजवा व डावा कालव्यांना यावर्षी रब्बी हंगामासाठी पाण्याचे ३ आवर्तन मिळणार आहेत. जिल्हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हयाचे पालकमंञी ना. गुलाबराव पाटील यांचेसह लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या झालेल्या प्रमुख बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. गिरणा नदीला गिरणा धरणातुन दि. ५ रोजी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे.तर गिरणा जामदा उजवा व डावा  कालव्यांना पाण्याचे पहिले आवर्तन दि. ७ रोजी कालव्यांना सोडण्याचा प्रयत्न आहे. भडगाव तालुक्यासह सर्वञ  मोठया प्रमाणात क्षेञ ओलीताखाली येणार आहे. पाटबंधारे विभागाने यापुर्वीच कालवे, पाटचार्या स्वच्छता व दुरुस्तीचे कामांना सुरुवात केली आहे. हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज तात्काळ भरावेत. पाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत  भडगाव उपअभियंता आर. डी.पाटील यांनी केले आहे.

याबाबत माहिती अशी कि, यावर्षी निसर्गाच्या चमत्काराने चारो और बारिश बरसली. नाशिक जिल्हयातील गिरणा धरणावर गिरणा काठाचे भवितव्य अवलंबुन आहे. हे गिरणा धरण पाण्याने यंदा शंभर टक्के भरलेले आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने एकुण ३ पाण्याचे आवर्तन नुकतेच जिल्हा बैठकीत जाहीर केलेले आहेत. रब्बी हंगाम पिक पेरण्यांसाठी कालव्याचे पाणी मिळावे अशी मागणी चाळीसगाव, भडगाव , चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, धरणगाव, एरंडोल आदि तालुक्यातील शेतकर्यांची होती. आता कालव्यांचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा , एरंडोल , पाचोरा, धरणगाव आदि तालुक्यातील मोठया प्रमाणात क्षेञ ओलीताखाली येणार आहे. यामुळे  शेतकरी वर्गातुन आनंद व्यक्त केला जात आहे. यापुर्वीच पाटबंधारे विभागामार्फत जामदा उजवा व डावा कालवा, पाटचार्या  साफसफाई, दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर चालु आहेत.  उजवा व डावा कालव्यांवर १२ ते १३ जे. सी. बी.आदि मशिनरीने कामे चालु आहेत.

ही कामे राञ अन दिवसा पुर्ण करावे अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे. पावसाळयात जामदा उजवा व डावा कालवा, पाटचार्या सभोवताली हिरवी झाडे, झुडपांनी अस्वच्छ बनले होते. काही ठिकाणी पाऊसाच्या पाण्याने कालवे वा पाटचार्या नादुरुस्त झाल्या होत्या. रब्बी हंगामाला पाण्याचे आवर्तन मिळणार आहेत. शेतकर्यांना बांधापर्यंत पाणी मिळावे. त्यापुर्वीच  जामदा उजवा कालवा व डावा कालवा, पाटचार्या, हिरवी झाडे झुडूपे तोडून स्वच्छ व  दुरुस्तीचे कामे करण्यात यावेत. पाटबंधारे विभागाने जीसीपी वा यंञसामुग्रीने जामदा उजवा कालवा व डावा कालव्याचे, पाटचार्यांचे स्वच्छता व दुरुस्तीचे कामांना सुरुवात केलेली आहे. ही कामे वेगात सुरु आहेत. दि. ५ रोजी  गिरणेला पाण्याचे  आवर्तन मिळणार  आहे. तर दि. ७ रोजी गिरणा जामदा व उजवा कालव्यांना पाण्याचे पहिले आवर्तन रब्बी हंगामासाठी मिळणार असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रब्बी पिक पेरण्यांसाठी शेतीची मशागतीचे कामे करण्यात शेतकरी धावपळ करतांना दिसत आहेत.कपाशीचे झाडे उपटुन जनावरांना खाऊ घालणे.

कपाशी झाडे शेताबाहेर टाकणे वा जाळणे आदि कामे करतांना शेतकरी नजरेस पडत आहेत. शेतांमध्ये काठेवाडीच्या गायी, मेंढया आदिंचे खटले, वाडे  हिरव्या कपाशीच्या शेतात बसलेले दिसत आहेत, जनावरांना चांगला हिरवा चारा भुक भागविण्यासाठी मिळत आहे. रब्बी हंगामाच्या पिक पेरण्या जवळपास ९० टक्के पुर्ण करण्यात आल्या आहेत. आता कालव्यांना पाण्याचे आवर्तने मिळाल्यावर शंभर टक्के रब्बी हंगामाच्या पिक पेरण्या होउन चांगला रब्बी हंगाम बहरणार आहे.  भडगाव तालुक्यासह, चाळीसगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगाव  तालुक्यातही मोठे क्षेञ ओलीताखाली येणार आहे.रब्बी हंगामाच्या चांगले उत्पन्न मिळणार. यावर मदार असुन शेतकर्यांच्या चांगल्या उत्पन्नाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भडगाव तालुक्यात  शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज भरणे सुरु केलेले आहेत. जास्तीत जास्त शेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत. पाण्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. यामुळे पाटबंधारे विभागालाही महसुल मिळणार आहे.

गिरणा जामदा उजवा व ङावा कालवा, पाटचार्या दुरुस्ती, स्वच्छतेचे काम चालु आहे. जिल्हा कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार गिरणा नदीला ५ तारखेला  पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. दि. ७ रोजी उजवा व डावा कालव्यांना पाण्याचे आवर्तन ३ आवर्तने जाहीर करण्यात आलेले आहे, जास्तीत जास्त शेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत. पाण्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत शेतकर्यांना करण्यात येत आहे. याबाबत गावोगावी दवंद्याही देण्यात आल्या आहेत.

आर. डी.पाटील.    

 पाटबंधारे उपअभियंता भडगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.