शेंदूर्णी येथील महिला वसतिगृह इमारत क्वारेंटाईन सेंटरसाठी प्रदान

0

शेंदूर्णी प्रतिनिधी : येथील अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरूड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची मालकीची महिला वसतिगृहाची सर्व सोयीने सुसज्ज इमारत असून आज शेंदूर्णी नगरपंचायत प्रशासनाचे विनंती वरून सदर इमारत कोरोना विषाणू प्रादुर्भाव संशयित व पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वारेंटाईन करण्यासाठी नगरपंचायतला देण्यात यावी अशी विनंती धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्याकडे केली असता त्यांनी तात्काळ महाविकास आघाडीच्या राज्य सरकारला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली व क्वारेंटाईन सेंटर साठी महिला वसतिगृह इमारत तात्काळ नगरपंचायतला प्रदान केली. या इमारतीत आवश्यक सर्व सुविधा असून बेड व जेवण ह्या सुविधा नगरपंचायत तर्फे पुरविल्या जाणार असल्याचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले आहे.नगरपंचायत

कडून या आधी २ इमारती क्वारेंटाईन सेंटर साठी निवडल्या होत्या परंतु स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवून कोरोना संशयित म्हणून क्वारेंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांमुळे गावातील नागरिकांत भीती असल्याने क्वारेंटाईन सेंटर गावापासून किमान १ किलोमीटर लांब असावे म्हणून शेंदूर्णी नगरपंचायतला निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी गावापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या गरुड महाविद्यालयाचे महिला वसतिगृह क्वारेंटाईन सेंटर म्हणून निवडले असून तसे पत्र महाविद्यालयास देऊन क्वारेंटाईन केलेल्या ३ नागरिकांना येथे हलविले आहे. त्या बद्दल नागरिकांनी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांचे आभार मानले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर.पाटील,रासेयो कार्यक्रम अधिकारी व डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील,प्रा.डॉ. आर.डी. गवारे, आरोग्य सेवक श्री.अरूण जावळे, वसतिगृह सेवक शकील भाई हे यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.