शेंदुर्णी येथील गरुड माध्यमिक विद्यालयात वर्धापन दिन व गुणवंतांचा सत्कार संपन्न

0

शेंदुर्णी, ता. जामनेर (प्रतिनिधी) : येथे आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप. सोसायटीचा 76 वा वर्धापन दिन व 12 वी परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दादासो. संजय रावजी गरुड होते.

प्रारंभी संस्थेचे प्रेरणास्थान व श्रद्धास्थान कै. आचार्य बापूसाहेब गरुड व कै. अण्णासाहेब गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. पी.उदार यांनी केले. विद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल 99.34% लागला तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला विज्ञान विभागातून प्रथम विद्या संदीप गुजर 84. 30%, द्वितीय रितेश उत्तम वानखेडे 81.38%, तृतीय साईराज प्रवीण गरुड 78.76%, तसेच व्यवसाय शिक्षण विभागातून प्रथम नितीन चरणदास नाईक 65 .07% द्वितीय निलेश राजू राठोड 64.15%,, तृतीय कुमारी मोनाली श्रीराम डांबरे 63.23%, तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी अक्षय अनिल परदेशी याचा महाराष्ट्र राज्यातून mpsc परीक्षेत तृतीय क्रमांकाने यशस्वी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते पालकांसह करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांच्या वतीने कुमारी विद्या गुजर व अंजली धनगर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून दादासाहेब संजयराव गरुड यांनी चांगल्या निकालाबद्दल समाधान व्यक्त करीत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन, चेअरमन प्रतिनिधी दादासो संजय जी देशमुख, ज्येष्ठ संचालक दादासो. यु. यु. पाटील,सौ. संगीताताई गरुड, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर इत्यादी बाबींची तंतोतंत पालन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी.पाटील यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक आर आर एस चौधरी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.