निपाणे परीसरात पावसाच्या कृपा दृष्टीने पिके डोलू लागली

0

निपाणे, ता. एरंडोल (वार्ताहर) : सध्या निपाणे सह परीसरात वरुण राजाची चांगली कृपा दृष्टी पडत असल्याने पिके डोलू लागली आहेत. गेल्या आठवड्यात शेतकरी वर्गाने रासायनिक खतांची पहिली मात्रा देवून आपल्या कर्तव्याचे पालन केले त्यावर पाऊस पडत असल्याने पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होवू लागली आहे. यंदा सोयाबीन वगळता सर्वच पिके चांगली असून कपाशी पिकावर तर एकही हात औषधी फवारणीचा नसल्याने शेतकऱ्यांचा बराच खर्च वाचला आहे निरक वातावरणात पिके हिरवीगार व टवटवीत दिसू लागल्याने शेतकरी वर्ग ही आनंदीत दिसू लागला आहे.

गेल्या वर्षी काही  शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला होता. अति वृष्टीने सर्वच पिकांचे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई नुकतीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. तसेच यंदा वरुण राजाची कृपा दृष्टी निपाणे सह परीसरावर चांगली असल्याने पिक परिस्थिती आजपर्यंत उत्तम असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.