शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0

जळगाव : एरंडोल येथील राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. काल सोमवारी ते गालापूर येथील शाळेत गेले. मात्र ते घरी परत आले नाही. मात्र आज सकाळी त्यांचा मृतदेह पलासदळ जवळ आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे . किशोर पाटील यांच्या अंगावरील फाटलेले आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी कुणी हातापायी केली आहे का? नेमके या ठिकाणी पाटील हे का आले होते? याबद्दल पोलीस प्रशासन तपास करीत आहे.

शवविच्छेदनंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल

दरम्यान, त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे आणण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील माहिती मिळू शकणार आहे. याबाबत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले की, मृतदेह रुग्णालयात असून शवविच्छेदन करणे बाकी आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. तोवर पोलीस इतर चौकशी करीत आहेत. किशोर पाटील यांच्या अंगावरील कपडे  फाटलेले आढळून आले आहेत.  त्यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या तसेच मृत्यूचे नेमके कारण काय हे शवविच्छेदन अहवालातून समजू शकणार आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता ठेवली असून पुढील माहिती घेत आहे.

किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहे. तसेच किशोर पाटील हे विविध संघटनेशी निगडीत होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मराठा महासंघावर नुकतीच त्यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

कोरोना काळात आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असतानाअडचणींवर मात करीत  प्रयोगशील प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर व त्यांच्या अर्धांगिनी शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी “घर…घर..शाळा – शिक्षण, आपल्या दारी”  हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहचविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.