शहरातील खड्डे व रस्त्यांची डागडुजी करा, अन्यथा….पंकज चौधरी यांचा इशारा

0

अमळनेर(प्रतिनिधी) : शहरालागत रा. मा.15 चे काम हायब्रीड अँम्युनीटी अंतर्गत उच्च दर्जाज्याचे काम सुरू आहे.सदर काम सुरू असताना दगडी दरवाजा चे देखील काम सुरू असल्याने सदर रस्त्याची परिमाणा पेक्षा जास्त वजनाची वाहतूक देखील रा.मा.06 वरून  वळवण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याची चाळण झाली आहे.विशेष म्हणजे सदर रस्ता हा नगरपरिषद समोरुन जातो तरी देखील नगरपरीषद फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

शहरात वाहनांची मोठी वर्दळ सुरू असल्याने दाट वस्ती,व्यावसायिक  परिसर संपूर्ण धुळी ने अच्छा दला जात आहे.त्या अनुषंगाने मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांताधिकारी,नगरपरिषद यांना निवेदन दिले आहे निवेदनात त्यांनी शहरात प्रवेशास एकमेव रस्ता असतांना प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी ह्याच मार्गाचा वापर करत असतील त्यांना ही दुरवस्था दिसत असेल पण कदाचित जे लोकप्रतिनिधी , अधिकारी हवाई मार्गाने प्रवास करत असतील त्यांना हे दिसत नसेल अशी उपहासात्मक विनंती केली आहे.

काही ठिकाणी तर रस्त्या मध्ये सुमारे 2/3 महिन्यापासून गटारी वरील ढापे/खड्डे पडल्याने वाहतुकीला त्रास होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत. काही ठिकाणी रस्त्याची दुरवस्थाकडे राजकीय भावनेने व द्वेषा पोटी ,हेतुपुरस्कर  दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चौधरी यांनी केला असून येत्या आठ दिवसात प्रमुख खड्डे व डागडुजी जर सार्वजनिक बांधकाम विभाग, व नगरपरिषदेने  केली नाही तर सर्व समावेशक आंदोलन करू व रा.मा.06 वरील वाहतुक आम्ही बंद करू असे निवेदनाद्वारे मागणी मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी प्रांताधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या कडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.