वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

0

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील खंडेराव नगरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने  प्रौढाला जोरदार धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. मेहबुब खान अफिस खान (वय-५४) असे मृत प्रौढाचे नाव असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

मेहबुब खान हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. ते हार्डवेअर दुकानावर काम करतात. आज गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी सायकलने खंडेराव नगरात आले. भाजीपाला घेवून पुन्हा पिंप्राळाहुडको येथे सायकलने जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंप्राळा हुडको परिसरातील नागरीकांना घटनास्थळी गर्दी केली होती. घटनास्थळाहून ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला आहे. मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.