वाघडू येथे बकरीने दिला सहा करडांना जन्म

0

चाळीसगाव( प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघडु येथे निसर्गाच्या चमत्काराने सर्वच अचंबित झाले आहेत. वाघडु येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पाटील यांच्या बकरीने सहा बच्यांना जन्म दिला आहे.  आपण बकरीला दोन पिलांना जन्म दिला हे ऐकले आहे परंतु वाघडू येथील एका शेतकऱ्याच्या बकरीने चक्क सहा पिलांना जन्म दिला, ही एक निसर्गाची किमया म्हणावी लागेल. सहाही बच्चे (करंडे) अत्यंत चांगल्या स्थितीत असून टणटणीत आहेत, तालुक्यातील वाघडू  येथील बाळासाहेब चिंतामण पाटील हे आदर्श शेतकरी आहेत, शेतीला जोड धंदा म्हणून  गाई , म्हशी व शेळी पालन  जोड व्यवसाय करतात, दुग्धव्यवसाय हा त्यांचा शेतीला जोडधंदा म्हणून आहे.

काही शेळ्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत, आजपर्यंत गाईने दोन वासरांना जन्म दिला हे आपण ऐकले आहे परंतु निसर्गाची किमया त्यांच्या बकरीने सलग सहा पिलाना जन्म दिला असून हे साहा ही बच्चे अत्यंत चांगली असून त्यांची प्रकृती धडधाकट आहे, त्या बच्चानां  आईचं म्हणजे त्या बकरीचे दूध कमी पडते म्हणून त्या पिल्लांना मालकाने इतर बकरीचे दूध पाजून त्यांचा उदरनिर्वाह करीत आहे, गरीबाची गाय म्हणून शेळीला सुंद्धा सोन्यासारखे भाव आले आहेत,बकरी पालन हा व्यवसाय शेतकरी जोड व्यवसाय करतात  शिवाय शेळी पासून व गाई म्हशी पासून मिळणारे खत हे शेतीला अत्यंत उपयुक्त असते, असे बाळासाहेब पाटील यांनी आमच्या प्रतीनिधिला सांगितले ते म्हणाले की माझा वडीलो पारिजीत शेती व्यवसाय असून  त्यांच्या जोडीला दुग्ध व्यवसाय मी करीत असतो माझ्या शेळीने सहा करडांना  जन्म दिल्याने  माझा सर्व परीवार खुशीत आहेत ,ज्या दिवशी जन्म दिला त्या दिवशी त्या बकरीला व त्या पिलांना पाहणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती, ग्रामीण भागात शेळी पालन हा शेतीला जोडधंदा  झाला आहे बोकडांना भाव  चांगला मिळत असल्याने या व्यवसायाला सोन्याचे दिवस आले  असल्याचे ते म्हणाले मागितले दोन मिळाले सहा हि देवाची दिला असल्याचे पाटील म्हणाले आम्ही त्या शेळीला प्रेमाने लाली ताई असे म्हणतो या सहा करडांना मध्ये चार बोकड व दोन बकरीचे बच्चे आहेत, बाळासाहेब पाटील यांचा शेती हा  मुख्य व्यवसाय असून त्याच्या जोडीला दुग्ध व्यवसाय म्हणून ते गाई म्हशी पाळतात  अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करून त्याला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा त्यांचा आवडीचा व्यवसाय झाला आहे ,वाघडू गाव चाळीसगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर आहे बाळासाहेब पाटलांचे पार्टनर आबासाहेब आनंदा पाटील हे  बकरी पालन करतात,  बाळासाहेब पाटलांचे वडील चिंतामण बापूराव पाटील हेआदर्श शेतकरी होते, यांना जिल्हा परिषद कडून १९७५या वर्षात जिल्हा परिषद  जळगाव, तर्फे आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला होता,त्यांचा आदर्श वारसा वारसा त्यांची मुले आदर्श शेती करत आहेत अत्यंत कष्टाळू मेहनती कुटुंब असून परीसरात परीचित  आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.