वरणगाव निर्माणी वसाहतील मुलांचा रंगला रंगारंग कार्यक्रम

0

वरणगाव :- भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील एक्टीव्ह किड इंग्लीश मिडीयम शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात लहान मुलांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. ज्युनियर क्लब मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक प्रभाकर तायडे, पत्रकार मनोहर लोणे, सेवानिवृत जे डब्लु एम नानक शर्मा, दर्यापूरच्या सरपंच वंदना चौधरी, कामगार युनियनचे महासचिव सुनिल महाजन, इंटकचे रवि देशमुख, भाम संघाचे सचिन चौधरी, आदी मान्यवर उपस्थीत होते.

वैष्णवी केऱ्हाळे हिने ‘मेरे वतन के लोगो’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पराग शिंदे, वृषभ चौधरी, धनश्री ठाकूर, राजीव राणे, धनंजय देवरे, आर्या चहाकर, प्रणित ठाकूर आदी ४ ते ५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी गायन, नाटय, नृत्य सादर केले. या प्रसंगी प्रभाकर तायडे, मनोहर लोणे, वंदना चौधरी व नानक शर्मा यांनी मनोगतात शाळेच्या प्रगतीबाबत विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था संचालक सुशांत चौधरी यांनी केले तर सुत्रसंचालन परवेज शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनिषा चौधरी, प्रमोद चौधरी, राणी हिवरे, दिपमाला कोळी व योगीता गावडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.