लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटलांनी टोचून घेतली लस

0

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनापासून बचाव होण्यासाठी सरकारने लसीकरण हाती घेतले आहे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,लोकनेते व रा.कॉ.चे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी देखील लसीकरण करून घेतले आहे.त्यात ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे.

याचाच भाग म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील(६५) व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील(७०) यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंदिरा भवन येथील लसीकरण केंद्रात लसीकरण करून घेतले.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण महत्वाचे आहे. लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर होऊन लसीकरणाला गती यावी यासाठी माजी आमदार व लोकनियुक्त नगराध्यक्षा यांनी स्वतः कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले.यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे, नगरसेवक बाबू साळुंखे,माजी नगरसेवक विक्रांत पाटील,रविंद्र पाटील,संजय चौधरी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे,लसीकरनानंतर देखील कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने करायला हवे.मास्क, सॅनिटायझर व सोसिएल डीसस्टनसिंग काही काळासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

 

कृषिभूषण साहेबराव पाटील

(माजी आमदार)

Leave A Reply

Your email address will not be published.