रमेश पाटील यांना वृत्तपत्र लेखक संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार

0

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार, लोकशाहीचे तालुका प्रतिनिधी तथा कवि रमेश जे. पाटील यांना मुंबई येथील मराठी वृत्तपत्र लेखन संघाचा राज्यस्तरिय पुरस्कार देण्यात आला आहे.

मराठी वृत्तपत्र लेखन संघातर्फे 45 व्या राज्यस्तरिय दिवाळी अंक स्पर्धेनिमित्त दिवाळी अंक परंपरा कालची आणि आजची  या विषयावर 800 शब्दमर्यादा असलेली खूली स्पर्धे आयोजित करण्यात आली होती. या स्पधेचे निकाल नुकतेच घोषीत करण्यात आले. त्यात कवी तथा लेखक रमेश जे. पाटील यांना निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ परितोषीक जाहीर झाले. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार दादर(मुबंई) येथे वितरीत करण्यात आला.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, कार्याध्यक्ष प्रशांत घाडीगांवकर, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांनी रमेश पाटील याचे विशेष कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.