मोहाडी शिवारात परप्रांतीय मजूराची आत्महत्या

0

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी शिवारात कंन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. भिकूकुमार सिंग नंदलाल (वय-२४ रा. झारखंड ह.मु.) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, झारखंडमधील भिकूकुमार नंदलाल हा तरूण शहरातील आरएमसी प्रपोर्शन बिल्डकॉन येथे गेल्या महिन्याभरापासून मजूराचे काम करतो. बांधकामाच्या ठिकाणी एका पत्र्याच्या खोलीत त्यांचे मजूरांसह राहत होता. नेहमीप्रमाणे बांधकामचे काम आटोपल्यानंतर भिकू कुमार हा गुरूवारी सायंकाळी ७ वाजता खोलीवर गेला. खोलीवर इतर सहकारी देखील राहत होते.

 

मात्र गुरूवारी सायंकाळी खोलीवर कुणही नव्हते. भिकूकुमार सिंग नंदलाल याने कापडाच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी सहकारी मजूर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी एमआयडीसी पोलीसांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ. अतुल पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.