मोजक्याच वऱ्हाडीच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा

0

लासुर ता.चोपडा(वार्ताहर)-विवाह म्हटला की शानशौकिनीसाठी अफाट खर्च,मानापमान,हुंडा या सगळ्या समाजातील गैर प्रथांना कोरोनाचा पार्श्वभूमीवर फाटा देवुन अत्यंत साधेपणाने मोजक्याच वऱ्हाडीचा उपस्थितीत  लासुर परिसरातील घोडगाव येथील तरुण पत्रकाराचा विवाह सोहळा पार पडला.

घोडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी संचालक प्रकाश पंडितराव रजाळे यांचे चिरंजीव व दैनिक देशदूत घोडगावचे पत्रकार चि.विजय रजाळे याचा विवाह सोहळा दि.५ मे रोजी पातोंडी(ता.रावेर) येथील रहिवासी दशरथ दलपत बोरसे यांची कन्या चि.सौ.का भावना हिच्याशी अत्यंत सध्या पद्धतीने आणि दोन्ही बाजूच्या केवळ पाच पाच अश्या दहा वऱ्हाडीचा उपस्थितीत पातोंडी येथे पार पडला.अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्न सोहळ्याचा निमित्ताने युआवक वर्गात आगळा वेगळा संदेश गेला.नवपरिणीत वधुवरांना अनेकांनी आशीर्वाद दिले असून कौतुकही केले.तापी सुतगीरणीचे चेअरमन तथा माजी आ.कैलास पाटील यांनी घोडगाव येथे जाऊन नवदाम्पत्यास आशीर्वाद दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.