भुसावळ येथे कावड यात्रेचे आयोजन

0

भुसावळ (प्रतिनिधी )- राजस्थानी विप्र समाज,शिव मंडळ, अलंकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्रावण महीन्‍याच्‍या मुहूर्तावर भुसावळ शहरात भव्य कावड़ यात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते.

राजस्थानी समाज व हिंदी भाषि कांचे हे शेवटचे श्रावण सोमवार असून यानिमित्ताने कांवड़ यात्रेचे आयोजन करण्‍यात येते. राजस्थानी विप्र समाज तर्फे साबूदाना खिचड़ी,चहा,केळी व फळांचे प्रसाद स्वरूपात कावड़ यात्रेकरूंना व  भोले भक्ताना वाटप करण्‍यात आले. महादेव मंदिर तापी नदी येथून प्रारंभ झालेली ही कावड यात्रा विठ्‍ठल मंदिर ,शिव मंदिर,लक्ष्मी चौक,महादेव मंदिर व राम मंदिरात आरती व प्रसादाचे भोग लावून संपन्न झाली.

यावेळी राधे भक्त बिरदीचंद लाहोटी, राजस्थानी विप्र यूवक समाजाचे अध्यक्ष तथा रक्षा सुरक्षा एजन्सीचे संचालक विनोद शर्मा,उमाकांत(नमा)शर्मा, जगदीश अग्रवाल,गोकुल अग्रवाल,संजय अग्रवाल,गौरव शर्मा, पंडित जगदीश शर्मा,पंडित गोपाल  शर्मा, कैलाश अग्रवाल, दीपचंद आगीवाल,गोसेवक रोहित महाले,अमोल सोनार, गणेश पाटिल,शुभम अग्रवाल, मोंटू वर्मा,दिनेश माहेश्वरी,आशीष तिवारी आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंडित राम गोपाल शर्मा, आदित्य शर्मा, प्रशांत शर्मा, रूपेश अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.