भुसावळ पोलिस विभागातर्फ़े महिला दिन साजरा

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळ पोलीस विभागाच्या वतीने 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील बाजारपेठ, शहर व तालुका पोलिस ठाणे येथे पोलिस काका , पोलिस दिदी, भरोसा सेल,बडी कोप कक्ष, शांतता सामिती सदस्य, जेष्ठ नागरिक योजना कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिक्षक गजानन राठोड , शहर पोलिस ठाण्याचे पो नि बाबासाहेब ठोबे , पो नी रामकृष्ण कुंभार , यांचेसह अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी  महिला दक्षता समिती महिला सदस्यांचा ,  पोलिस कर्मचारी , होमगार्ड ,वाहतूक पोलीस कर्मचारी  महिलांना गुलाबपुष्प देवून त्यांचा सन्मान केला.

प्रसंगी उपविभागिय पोलिस अधीक्षक गजानन राठोड यांनी जगात भीती पसरवीणाऱ्या कोरोना व्हायरस बद्दल कोणती खबरदारी व काळजी घ्यावी याबद्दलही सूचना  करून मार्गदर्शन केले. यावेळी  डॉ कीर्ती फलटनकर, अँड. वैशालीव चौधरी, पत्रकार उज्वला बागुल ,माजी नगरसेविका शारदा झोपे ,भारती म्हस्के, शीतल आव्हाड,रेखा गायकवाड़, वैशाली ठाकुर, कल्पना दामले, कल्पना कोल्हे, जयश्री हातेकर, राजश्री सुरवाडे, आरती जोहरी, टिना धांडे,सुरेखा ठाकुर, यांचेसह सर्व महिला पोलीस कर्मचारी सपकाळे, तडवी, जोशी, यांचेसह सर्व दक्षता समिती सदस्यां उपस्थित होत्या. यशस्वितेकरीता बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नंदू सोनवणे, शहरचे पो कॉ बोदडे, यांच्यासह तालुका पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.