भुसावळ नपचा १५२ कोटींपेक्षा जास्‍तीचा अर्थसंकल्‍प मंजूर

0

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील नगरपरिषदेच्‍या १५२ कोटी २३ लाख ८६ हजार ५८९ कोटी रुपयांच्या कुठलीही करवाढ नसलेल्या तसेच ६७ लाख ७० हजार ७४२ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.  नगरपरिषदेच्‍या सभागृहात आज दि.२८ फेब्रुवारी आयोजित विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे हे होते.व्यासपिठावर मुख्याधिकारी करुणा डहाळे, गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सभागृहात ऐनवेळी हातात पडलेल्या अंदाज पत्रकावर अभ्यास होत नसल्याने अभ्यासपूर्वक चर्चा करता येत नाही. याबाबत मागील वर्षी सभागृहात सुचना देऊनही यावर्षी ही ऐनवेळी अंदाज हाती देण्यात आले. यापुढे पालिकेच्या अंदाज पत्रकाची प्रत सभेच्या अजेंड्यासोबत मिळावी अशी मागणी केली. या शिवाय नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्‍त कर ३६० रुपये करण्यात आला आहे. तो वाढविण्याची पद्धत कशी?हा कर काय आहे? शासनाचे निर्देश काय याबाबत विचारणा केली असता नगराध्यक्ष श्री.भोळे यांनी घनकचरा व्यवस्थापन कराबाबत राज्य शासनाचा आदेश राज्यातील नगरपरिषदांना बंधनकारक असल्यामुळे अति विलंबाने हा कर लावण्यात आला आहे. यात रहिवासी इमारतींसाठी ३६० तर व्यवसायिक प्रतिष्ठानांसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत आहे.जत्रा, आनंद मेळावा,हंगामी कार्यक्रम यासाठी दर निश्‍चित नाही ते पालिकेने ठरवावेत अशा सुचना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विशेष सभेत सांडपाणी विल्हेवाट साठी ४ कोटी ५० लाख, नवीन वस्तीतील नवीन रस्ते दहा कोटी,रस्ते,ढापे,छोटे पुलांसाठी ५ कोटी,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ५५ लाख रुपये,भुसंपादन २ कोटी,घनकचरा,सांडपाणी व्यवस्थापन १ कोटी यासह विविध मुद्यांवर साधारण १५२ कोटी २३ लाख १६ हजार ५८९ रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यात साधारण १५१ कोटी, ५६ लाख १५ हजार ८४७ रुपयांचा खर्च तर ६७ लाख ७० हजार ७४२ रुपयांचा अंदाज पत्रक यावेळी सादर करण्यात आला.

नगरपरिषदेला एकत्रीत कर, जलनिस्‍सारण कर,वृक्षकर, शिक्षणकर,पाणीपट्टी व उपकर,हद्दीतील जाहीरात,जमीन भाडे, इमारत भाडे क्रिडांगण व इतर भाडे,नगरपरिषद रूग्‍णालय फी,बांधकाम परवानगी,जन्म- मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, विकास शुल्क विविध अनुदान, महसुली अनुदान,शासकीय अनुदान,थोर पुरुष-व्यक्तींची स्मारके, पुतळे, पंतप्रधान आवास योजना,अमृत योजना,गुंतवणुक व्याज,विविध भांडवली उत्पन्नातून पालिकेला १४३ कोटी ८८ लाख ९१ हजार ९५० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

तर वेतन बँड,ग्रेड पे,महागाई, घरभाडे,वाहतुक भत्ते,प्रशासकीय वर्गणी,स्टेशनरी,इतर मानधन, थकीत वेतन,घरपट्टी परतावा,मुळ पेन्शन,उपदान, अर्जीत वेतन,अग्‍निशमन वाहने दुरुस्ती आदी,दिवाबत्ती दुरुस्ती,इलेक्ट्रीकल दुरुस्ती व इतर, दुभाजकांमध्ये नवीन पथदिवे, डिझेल, औषधी, साथीचे रोग नियंत्रण व इतर,मोकाट गुरांचा बंदोबस्त,स्मशान, कब्रस्तान,पाणी पुरवठा विभाग, न.पा दवाखाने,आयुर्वेद दवाखाना,माता बालसंगोपन विभाग,मलेरिया विभाग,नपा शाळा,वाचनालय,किरकोळ खर्च, नपा निधी,शासकीय योजना, भांडवली खर्च यासह विविध खर्चासाठी १५१ कोटी ५६ लाख १५ हजार ८४७ रुपयांचा खर्च यात होणार आहे.

पालिकेचा १५१ कोटी ५६ लक्ष १५१ हजार ८४७ मात्र खर्चाचा, तर तर ६७ लक्ष ७० हजार ७४२  शिलकी अर्थसंकल्पाचे वाचन मुख्याधिकारी श्रीमती करुणा वसंतराव डहाळे यांचे मार्गदर्शनाखाली लेखापाल  संजय हरी बाणाईते यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.