भुसावळ नजिक वांजोळा रोडवर भरदिवसा दरोडा ; एक लाख 56 हजारांची रोकड लंपास

0

भुसावळ (प्रतिनिधी)- वांजोळा-मिरगव्हाण रस्त्यावर भरदिवसा  फायनान्सच्या वसुली अधिकाऱ्यास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण  करीत लुटले असून त्याचे कडील एक लाख 56 हजारांची रोकडसह पोबारा केल्याची  घटना शुक्रवारी दुपारी 12.30 ते एक वाजे दरम्यान येथे घडली.  भर दिवसा पडलेल्या दरोड्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिड तास उलटूनही तालुका पोलिसांचे पथक  घटनास्थळी न पोहोचल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला. भुसावळातील उज्जीवन फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी उमेश रंगनाथ सपकाळ (35) हे वांजोळा भागातून वसुली करून परतत असताना शेताजवळ थांबलेल्या दोघा लुटारूंसह दुचाकीवरून आलेल्या एका लुटारूने सपकाळ यांना अडवत त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्या बॅगेतील सुमारे एक लाख 56 हजारांची रोकड लांबवून पोबारा केला. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना कळवल्यानंतरही सुमारे दिड तास उलटूनही पोलिस न पोहोचल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला.  दरम्यान, घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.