भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ- कटनी पॅसेंजर दोन दिवसांसाठी रद्द राहणार आहे.रेल्वे प्रशासनातर्फे इटारसी-जबलपूर दरम्यान सोनतलाई व बागरटावा मध्ये दुस-या लाईनचे व नॉन इंटरलॉकिंगचे कार्य होणार असल्याने भुसावळ-कटनी पॅसेंजर गाडी क्रमांक ५११८७ डाऊन ही गाडी दिनांक १६ व १७ फेब्रुवारी रोजी दोन दिवस प्रस्थान स्थानकावरुन रद्द राहील.
तर गाडी क्रमांक ५११८८अप कटनी-भुसावळ पॅसेंजर ही दिनांक १६ फेब्रुवारी रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द राहील असे भुसावळ रेल वाणिज्य विभागाने कळविले आहे.