भुसावळात दिव्यांग सेनेची मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा

0

भुसावळ :- अपंगांना नगरपरिषदेच्या विविध करातून 5 टक्के करातून निधी अपंगांना देण्याची तरतूद असून त्यांना ते देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी आज दि.12 मार्च रोजी दिव्यांग सेनेचे प्रदेश अध्यक्ष भरत जाधव, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर पाटील, नूतन भुसावळ शहराध्यक्ष दिपक कुळकर्णी, तालुकाध्यक्ष पंकज सोनवणे आदींनी मुख्याधिकारी रोहिदास दोलकुळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी शिष्टमंडळाला सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असुन कुठल्याही मागण्यांबाबत आचारसंहिता नंतर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.यावेळी धर्मेंद्र जैन, दिपक पुरोहित, अशोक सोकिया, तुषार चौधरी, वसीम खान, भारती किनगे, राजेश्री चौधरी, मुश्ताक बागवान, रेखा सपकाळे, रवींद्र महाजन, अंजिली रूनवाल,किशोर पाटील, कुणाल भारती,दिनेश मोची, कौतिक ननवरे आदी उपस्थित होते.दिव्यांग सेना अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.