भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद

0

बाजारपेठ पोलिसांची कौतुकास्पद कामगीरी

भुसावळ (प्रतिनिधी)– शहरातील रेल्वे स्टेशन चौकी परिसरात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असणाऱ्या तरुणास बाजारपेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केल्याची घटना येथे घडली.

आज शुक्रवार ९.४५ वा.सुमारास भुसावळ शहरात स्टेशन चौकी परीसरात चर्च जवळ सार्वजनिक जागी एक इसम हा त्याच्या क़ब्ज्यात  गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बाळगून फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले ,अप्पर.पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी  गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक  दिलीप भागवत , यांच्या मार्गदर्शना खाली  पोलीस नाईक नरेंद्र चौधरी ,यासिन पिंजारी पो.कॉ कृष्णा देशमुख ,प्रशांत परदेशी यांचे पथक   त्वरित स्टेशन चौकी परिसरात रवाना झाले . व तिथे  सापळा रचुन आरोपीस  ताब्यात घेतले . यावेळी चौकशीत आरोपी सतिश रमेश सपकाळे वय – 21 रा.रमाबाई आंबेडकर नगर गाव-अकलुद ता.यावल जि.जळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले  त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला सुमारे 5 हजार रुपये किंमतिचा  एक गावठी कट्टा व पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस मिळाले .यावरून बाजार पेठ पोलीस स्टेशनला  भाग 6 गु.र.न 549/2019 आर्म अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   गुन्हयाचा अधिक  तपास पो.ना नरेंद्र चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.