भातखंडे गावाची साक्ष देतोय जुन्या जमान्यातील वाडा

0

भातखंडे (प्रतिनिधी)  भातखंडे गावाची ऐतिहासिक ओळख सांगता येणार नाही पण भौगोलिक स्थिती जरूर सांगता येईल हे गाव गिरणा नदीच्या काठावर वसले असून गावाची स्थापना सुमारे ११६० मध्ये झाली असल्याचे जुने जाणकार सांगतात. गावात प्रवेश गाव दरवाजातून होतो. प्रवेश केल्याबरोबर  गावांची साक्ष देणाऱ्या हाच तो जुन्या जमान्यातील वाड्याचे दर्शन होते हा वाडा त्यावेळच्या जहागीरदार यांचा आहे की काय असे गावात येणारे नवीन अतिथी विचारल्याशिवाय राहात नाही परंतु हा जहागीरदार यांचा वाडा नाहीतर हा वाडा धनजी पाटील यांचा होता त्यांनी २०० ते  ३०० वर्षांपूर्वी बांधला ते गावातील प्रतिष्ठित जगन्नाथ पाटील/ पुंडलिक पाटील/ काशिनाथ पाटील यांचे पणजोबा होते. ज्यावेळी जुन्या जमान्यात दुष्काळाचा काळ होता.

त्यावेळी पाथरवट लोकांना मजुरी मिळावी म्हणून या लोकांना मजुरी म्हणून धान्य देऊन हा वाडा बांधण्यात आला. वाडा बांधायला त्या काळी एक ते दीड वर्ष लागले असावे. वाड्याच्या चौफेर घडीव दगडाच्या अडीच फूट रुंदीच्या भिंती बांधल्या आहेत. वाड्याचे संपूर्ण काम त्या काळी मातीत झाले आहे. वाडा हा ९९ चष्म्याचा असून त्याच्या बांधकामात सागवानी लाकूड वापरले आहे. त्याची रुंदी ११ चौकी असून त्याठिकाणी धान्याचे कोठार होते. वाड्यात आज जरी रहिवास नसला तरी त्या काळची तो साक्ष देत उभा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.