भडगावातील दिव्यांग बांधवांना नगरपालिकेने पाच टक्के निधी लवकर न दिल्यास आमरण उपोषण

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी नगरपालिकेने लवकर द्यावा. यासाठी भडगाव तालुका अपंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात नमूद केले आहे की, कोविड १९ कारोना या महामारी मुळे अपंग बांधवांवर उपासमारीची वेळ आली असून   नगरपालिकेने मागील वर्षाप्रमाणे या वर्षाचा पाच टक्के निधी अपंग बांधवांना सरसकट देण्यात यावा. जेणे करून सदर उपासमारीची वेळ येणार नाही. सदर आमच्या अपंग बांधवांकडून कुठल्याही प्रकारचे रोजगार कामधंदे करता येणार नाही तरी आपण दि.१०/०८/२०२० पर्यंत सर्व अपंग बांधवांना पाच टक्के निधी सरसकट वाटप करण्यात यावा. सदर मागणी मान्य न झाल्यास दि.१५/०८/२०२० रोजी नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासकाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर भरत धोबी, संजय सोनवणे, संजय कोळी यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, तहसिलदार भडगाव, पोलिस निरीक्षक भडगाव यांना दिल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.