भडगावातील कोरोना फैलावास जबाबदार असणाऱ्यांविरोधात चौकशी करू गुन्हा दाखल करावा

0

भडगाव (प्रतिनिधी) : कारोनाचा भडगाव शहरात शिरकाव होण्यापूर्वी ११/०५/२०२० पर्यंत भडगावात लॉक डाऊन नियमानुसार अंत्यविधी हे होत होते. परंतु ११/०५/२०२० रोजी शहरातील दत्तमठी गल्लीतील रहिवासी वृद्ध पाचोरा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थी मृत्यू झाला होता.

यावेळी वृद्धाचा कोरोनाचे प्रथमदर्शनीय लक्षण असल्याने त्याचे स्वब घेण्यात आले होते. याची परिवारास आपण काय करीत आहोत याची जाणीव असताना डॉ. परदेशी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत मृतदेह हा परिवाराच्या ताब्यात दिला परिवाराने वृद्धाचा अंत्यविधी हा आपल्या शेतात दोनशे ते अडीचशे लोकांच्या उपस्थितीत केला या घटनेबाबत महसूल व पोलीस प्रशासन अनभिज्ञ नव्हते व नाही हे सर्व माहिती असतांना देखील त्यांनी जिल्हाधिकरी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली व या रोगाचा प्रादुर्भाव हा शहरात, तालुक्यात आणि इतर तालुक्यात देखील झाला या दुष्कृत्यास संबंधित डॉक्टर, महसूल व पोलीस प्रशासन कारणीभूत झाले आहेत.

सदरच्या गुन्ह्याचा सम्पूर्ण तपास होऊन डॉक्टर तसेच वृद्धाचा मुलगा हा वरिष्ठ महसूल अधिकारी असल्याने प्रशासनाची नारमाई ची भूमिका घेत संगमताने कोरोना या महाभयंकर रोगाची माहिती लपवून ठेवली आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली नाही त्यामुळे कोरोनाचा फैलाव झालं म्हूणून त्याच्या वर भा. द. वि. २६९, २७१, २९० नुसार प्रशासकीय अधीकारिंवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची तंतोतंत पालन करण्याचे कर्तव्य असताना त्यांनी ती पाळली नाही. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले. म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे आपण त्याच्यावर भा. द. वि. कलम १८८ नुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ( ब ) व पोलीस कायद्याचे कलम ३७ (३) व १३५ तसेच साथीचे रोगप्रतिबंधक कायदा १,२,३, कायद्या नुसार कडक कार्यवाही करण्यात यावी असे लेखी तक्रार माजी नगरसेवक सचिन चोरडिया यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना ई- मेल द्वारे पाठविले असून तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, माजी मंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक जळगाव, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक भडगाव यांना ही मेल करण्यात आल्याची माहिती सचिन चोरडिया यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.