भडगांव येथे सावित्रीआई फुले जयंती उत्साहात साजरी

0

भडगाव (प्रतिनिधी) :  क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती सावित्री-उत्सव म्हणून भडगांव येथे एकवीरा देवी मंदिराच्या प्रांगणात सावित्री शक्तीपीठ पुणे  व एकवीरा देवी महीला मंडळ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात क्रांति ज्योती सावित्रीमाई व राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन माल्यार्पण  करुन मान्यवर अतिथी जिल्हा दूध संघ संचालिका डॉ.पुनमताई पाटील,महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेवीका योजनाताई पाटील,साई शिक्षण संस्था सचिव नगरसेविका सुवर्णाताई पाटील व उपस्थित महिलांनी अभिवादन केले.

सावित्री शक्तीपीठ सचिव नयना कापुरे यांनी कविता सादर करुन सावित्रीमाईना मानवंदना दिली.मी सावित्री बोलतेय या विषयावर साक्षी सोमंवशी,गार्गी बाविस्कर व पलक सोनवणे यांनी वक्तृत्व सादर केले.सावित्रीमाईचा जिवनपट उषा खेडकर यांनी मांडला.डॉ.पुनमताई पाटील यांनी आजच्या स्त्रीची कार्यशक्ती व योगदान याबाबत मार्गदर्शन केले.योजनाताई पाटील व सुवर्णाताई पाटील यांनी आजच्या महिलासांठी सावित्रीमाईचे योगदान अतिशय अमूल्य व किती महत्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्ष सावित्री शक्तिपीठ संगिताताई महाजन यांनी सावित्री-उत्सव घराघरात साजरा करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन वैशाली बाविस्कर यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी असंख्य महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.