बोदवडमधील अजून तीन जण कोरोनामुक्त

0

शहरातील एकुण ९ जणांनी केली आजपोवतो कोरोनावर मात 

बोदवड : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतांना या विषाणूवर मात करीत बरे होणा-यांची संख्या सुध्दा वाढत आहे. शहरातील रेणुका माता मंदिर परिसरातील एकाचं कुटंबातील सहा जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांच्यावर यशस्वी उपचार होऊन दि.१७ बुधवार रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुढिल १० दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.तर आज दि.१९ जून शुक्रवार रोजी शहरातील अजून तीन जण कोरोनामुक्त झाले असून शहरातील कोविड सेंटर मधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजपोवतो शहरातील ९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

याप्रसंगी तहसिलदार हेमंत पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज चौधरी, नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांचेसह तालुक्यातील अधिकारी,कर्मचारी वर्ग,आशा वर्कर उपस्थित होत्या.

शहरात एकुण १५ कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी १ मयत झाले आहे तर शहरातील एकाचं कुंटुबातील सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत तर आज अजून तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. एकदंर ही बाब संपुर्ण तालुक्यातील जनतेसाठी दिलासादायक म्हणावी लागेल.

घाबरू नका पण काळजी घ्या,विनाकारण घराबाहेर पडू नका,कामानिमित्त घराबाहेर पडताना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधा,वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा असे आव्हान सुध्दा यानिमित्ताने तालुका आरोग्य प्रशासन व नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.