केंद्र व राज्य सरकारने सर्व चिनी कंपन्यांचे टेंडर ,उद्योगांना देण्यात येणाऱ्या परवानग्या तात्काळ रद्द कराव्यात

0

सह संपादक जितेंद्र जैन

पाचोरा (प्रतिनिधी) : संम्भवामी ही एक देश व देशातील नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी काम करणार्‍या स्वयंसेवकांची एक संघटना आहे. आगामी कार्यक्रमात स्वदेशी संदर्भात उद्योजकता विकास, शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, जागरूकता, महिला सक्षमीकरण यांचा समावेश आहे. आणि हा एक प्रमुख भाग आहे. भारतातील प्रत्येक घरात स्वदेशी मिशन जबाबदारीने, देशभावनेने पोहचवणे व आत्मनिर्भरता आणि स्वयंरोजगार ही या अभियानाची मुख्य भूमिका आहे. संम्भवामी संस्था राज्यात काही महिन्यांपासून पूर्णतः स्वदेशी मिशन चळवळ रुपात चालवत आहे. स्वावलंबन व स्वयंरोजगार चा नारा देत, भारतीय उत्पादकांची निर्मिती, गुणवत्ता, विक्री यावर जमिनीवर कार्य करून लोकांमध्ये स्वदेशी संदर्भात जनजागृती करुन, याबाबत शिबीर घेतली जात आहेत. स्वदेशी उपभोक्ता कसा वाढेल यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करून गावा – गावात ही संम्भवामी चळवळ कार्य करत आहे. देशातील उद्योग, निर्माते यांना संधी मिळावी व चीनला धडा शिकवावा म्हणुन केंद्र व राज्य सरकारने सर्व चिनी कंपन्यांना देण्यात आलेले टेंडर, उद्योगांना देण्यात येणाऱ्या परवानग्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी संम्भवामी कडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.