फैजपूर येथे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा सत्कार

0

फैजपूर (प्रतिनिधी): अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी निधी संकलन करण्यासाठी श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन समितीची स्थापना ट्रस्ट तर्फे करण्यात आली आहे.

या समितीच्या देवगिरी प्रांताच्या भुसावळ जिल्हाध्यक्ष पदी फैजपूर येथील ऐतिहासिक संतपंथ मंदिर संस्थान चे गादिपती तसेच अखिल भारतीय संत समिती चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांची निवड झाल्याबद्दल खान्देश नारीशक्ती गृप व दिपाली गृप्स तसेच जन संघ सेवक मंच तर्फे महाराजांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, जनसंघ सेवक मंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, देवेंद्र झोपे सर, हभप रेवा बाबा चौधरी यांच्या सह भक्त मंडळी उपस्थित होते.सर्व धर्म,पंथ तसेच सर्व प्रांतातील लोकांनी या ऐतिहासिक श्रीराम मंदिर निर्माणात सहभाग घेऊन या धर्मकार्यात हातभार लावावा असे आवाहन यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.