पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांची मेगा भरती ; दहावी उत्तीर्णांना परीक्षेविना थेट संधी

0

भारतीय पोस्ट विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 29 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आता अर्ज करण्यासाठी 29 मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांसाठी भरती

ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 2428 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे मानले जाईल.

वयोमर्यादा आणि शुल्क :

या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येईल.

पगार :

ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी 12000 रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना 10000 रुपये (4 तासाच्या सर्विससाठी) पगार मिळेल.

महाराष्ट्र सर्कलमधील आरक्षणनिहाय जागा

खुला प्रवर्ग-1105, एसटी- 244, एससी -191, ओबीसी- 565, ईडब्ल्यूएस 246, दिव्यांग- 77 जागांवर भरती होणार आहे.

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.