पुणे-नागपूर, पुरी-शिर्डी मार्गावर विशेष रेल्वे गाड्या

0

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेतर्फे नाताळनिमित्त रेल्वे गाड्यांनी होणारी गर्दी व प्रवाशांची गैरसोय पाहता विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे .
यात पुणे-नागपूर साप्ताहिक गाडीच्या सहा तर पुरी-शिर्डी गाडीच्या चार फेर्या होणार आहेत.

पुणे-नागपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक 01287 ही गाडी 20, 27 डिसेंबर व 3 जानेवारी दर शुक्रवार रोजी साडेआठ वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसर्या दिवशी अडीच वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01288 ही विशेष गाडी 22,29 डिसेंबर व 5 जानेवारी दर रविवारी नागपूर येथून चार वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 10.15 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला अहमदनगर, बेलापूर, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीतीला तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, 14 शयनयान आणि सहा सामान्य द्वितीय श्रेणी डबे जोडण्यात येणार आहे.

पुरी-साईनगर विशेष गाडी
पुरी-साई नगर शिर्डी साप्ताहिक विशेष चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक 08429 अप ही गाडी पुरी येथून दर बुधवारी दुपारी 12.12 वाजता 4 ते 25 डिसेंबर दरम्यान धावणार असुन दुसर्या दिवशी आठ वाजता शिर्डी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 08430 डाऊन साई नगर शिर्डी-पूरी साप्ताहिक विशेष गाडी साईनगर शिर्डीहून प्रत्येक शुक्रवारी 6 ते 27 डिसेंबर पर्यंत धावेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता पुरीला पोहोचेल. ही गाडी खुर्दा रोड जंक्शन, भुवनेश्वर, नारज मार्तपूर, ढेंकनाल, तालचेर रोड, अंगुल, रायखोल, संबलपूर, बारगढ रोड, बलागीर, टिटलागड, कांताबाजी,खैरावर रोड, महासमुंद, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बदायूं, बदायूं रोड, शेगाव, भुसावळ आणि मनमाड या स्थानकावर थांबेल. या गाडीत चार वातानुकूलीत तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.विशेष गाड्यांसाठीचे आरक्षण हे विशेष शुल्कासह 4 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइट वरुन करता येईल. या विशेष गाड्या सामान्य व्दितीय श्रेणीचे अनारक्षित डबे म्हणून धावतील आणि अतिजलद, मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू केलेल्या यूटीएस प्रणालीद्वारे तिकिटे बुक करता येतील.गर्दीच्या काळात विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.