पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यतील तामसवाडी येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी तिन जणांन विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि पारोळा तालुक्यातील तामसवाडी गावातील तीन तरुणांनी गावातील अल्पवयीन तरुणी ची वारंवार छेड काढुन लज्जा वाटेल असे बोलुन व शरीरसुखाची मागणी करित छेड काढत असल्याने सदर तरुणीने पारोळा पोलिस स्टेशनला गावातील मनोज भारत बेलदार,योगेश रामचंद्र बेलदार,तसेच प्रविण विजय बेलदार,या तिघा विरुघ्द तक्रार दिल्या ने पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत,