पाचोरा येथे इर्टीका क्रुझरवर जावुन धडकल्याने भिषण अपघात

0
 विवाह आटोपुन परत जातांना तर दुसरे विवाहासाठी येतांना वाहनांचा झाला अपघात
 पाचोरा  प्रतिनिधी
     पाचोरा येथील भडगांव रोडवरील निर्मल सिड्सच्या मेन गेट जवळ जामनेर हुन विवाह आटोपुन संगमनेर येथे भरधाव वेगात जाणाऱ्या इर्टीकाने पंढरपुरहुन पाचोऱ्यास विवाहास वऱ्हाड घेवुन येणाऱ्या क्रुझरवर धडकल्याने दोन महिलांसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दि. १२ रोजी होत असलेल्या लग्नातील वधुचे माता – पिता जखमी झाले असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
        पाचोरा येथील निर्मल सिड्स जवळ सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान संगमनेर येथील आलेख कुदळ याचा विवाह जामनेर येथील असमत कुटुंबातील वधुशी दि. ११ रोजी आटोपुन आल्यानंतर मारुती इर्टीका (क्रं. एम. एच. १७ ए. झेड. ७६०५) मध्ये वर पक्षाकडील वऱ्हाडी संगमनेर येथे जात होते. यात आकाश ढोले वय – २७, विशाल ढोले वय – २८, आदेश प्रभात वय – २६, विक्की अष्टेकर वय – २६ (इर्टीका चालक), मयुर भालेकर वय – २७ हे इर्टीका मधील पाच जण गंभीर जखमी झाले. डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार इर्टीका गाडीतील जखमी पाचही इसम दारुच्या नशेत तर्र असुन वाहनात दारुच्या बाटल्या ही आढळुन आल्या.
तर दुसऱ्या अपघातात पाचोरा येथील निलम हाॅटेलचे संचालक प्रदिप श्रावण मराठे यांचे चिरंजीव राहुल याचा विवाह दि. १२ रोजी पाचोरा येथे असल्याने त्या विवाहासाठी पंढरपुर येथुन क्रुझर (क्रं. एम. एच. १३ ए.सी. ९५८९) मध्ये सुमारे १० वऱ्हाडी असतांना त्यातील वधुची आई सुनिता सुभाष कोताळे वय – ३५, वधु पिता सुभाष मनोहर कोताळे वय – ४५ व गंगा शिवाजी गायकवाड वय – ३८ हे गंभीर जखमी झाले. जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन घटने प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
*संगमनेर येथील एक वऱ्हाडी आदल्या दिवशीच झाला होता जखमी*
     संगमनेर येथील आलेख कुदळ याचा जामनेर येथे विवाह दि. ११ रोजी होता. या विवाहासाठी येणाऱ्या वऱ्हाडींमध्ये विशाल बेंडाळे हा दि. १० रोजी भडगांव रोड जवळ शौचालयासाठी जात असतांना पुलाहुन पडल्याने जखमी झाला होता. त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने दुसऱ्या दिवशी वऱ्हाडी मंडळीतील काही मित्र येथील विघ्नहर्ता मल्टिस्पेशिलिटी हॉस्पिटलमध्ये जखमीच्या तब्यतीची चौकशी करण्यासाठी आल्यानंतर काहीच वेळात त्याच वऱ्हाडीतील पाच जखमी झाल्याने त्याच हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर डॉ. भुषण मगर, डॉ. प्रविण देशमुख, डॉ. संदिप इंगळे, डॉ. जितेश पाटील, डॉ. सचिन वाघ यांनी उपचार केले. तर जखमींना रुग्णवाहिका चालक भागवत पाटील यांनी उपचारासाठी दाखल केले.

Leave A Reply

Your email address will not be published.