पंकजा मुंडेंचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आला…

0

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. खुद्द पंकजा मुंडेंनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ‘माझी कोविड-19 (covid-19) ची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या मतदानापासून पंकजा मुंडे लांब राहिल्या. त्यावेळी अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट करुन आपण आयसोलेट असल्याची माहिती दिली होती.

 

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री 11.31 च्या सुमारास केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.