नेट बंदमुळे खरेदी विक्री नोंदणी कार्यालयात कामांचा खोळंबा !

0

भडगाव (प्रतिनिधी) :- ऑनलाईन व्यवहारासाठी कामांसाठी नेहमीच येणारी महत्वाची अडचण म्हणजे नेट बंद .नेट बंद या कारणामुळे भडगाव दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत होणारी खरेदी विक्री नोंदणी , खरेदीखत नोंदणी हि कामे चक्क ठप्प आहेत.

अनेक लोकांची हि कामे खोळंबल्यामुळे त्यांना सतत तहसिल कार्यालय आवारात चकरा माराव्या लागतात . लांबून खेडयातून आलेल्या जनतेला या नेट बंद मुळे फार त्रास सहन करावा लागतो . गेल्या ६ ते ७ महिन्यान पासून हि समस्या जास्त भेडसावत आहे. त्यातल्या त्यात आता सगळीकडे रस्त्यांची कामे चालू आहेत . पुन्हा पुन्हा खोदून खडी टाकली जाते . खोदकाम चालूच असते. नविन रस्ते तयार केले जातात त्यामुळे रस्त्याखाली असलेल्या वायर तुटतात . त्यामुळे पुन्हा लाईन बंद होवून नेट बंद होते . बऱ्याच वेळा सरव्हर जाम होते.
बी.एस.एन.एल. विभागाने बरेच दिवस लाईट बील भरलेच नाही .या विभागाचे जवळजवळ १९३००० रुपये लाईट बिल थकलेले होते. ते बील त्यांनी त्यांनी काही दिवस न भरल्यामुळे देखिल नेट बंदची समस्या निर्माण झालेली होती.

नेट बंद असल्यामुळे सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होतो . दुय्यम निबंधक कार्यालयात ज्या लोकांची कामे आहेत त्या नागरिक नेट बंद या समस्येमुळे कमालीचे हैराण झालेले आहेत . तरि सतत होणारी नेट बंद या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी अशी जनतेची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.