निपाणे परीसरात पावसाची जोरदार हजेरी ; शेतकरी सुखावला

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : निपाणे सह परीसरात वरुण राजाने जोरदार हजेरी लावून शेतकऱ्याला समाधानी केले आहे. गेल्या ८-१० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक कामे खोळंबली होती त्यात प्रामुख्याने रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकरी थांबले होते. आता मात्र, दि,१३ जुलै च्या रात्री ७ – ३० ते ९ वाजेपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावून बळीराजाला आनंदीत केले आहे.

ऐन मोक्याच्या वेळी वरुण राजाने जोरदार हजेरी लावल्याने शेती विषयक कामांना वेग आला आहे. सध्या कोरोनाची महामारीने जगावर मोठे संकट आणून सोडले असून अशाही परिस्थितीत शेतकरी जिवाची पर्वा न करता आपल्या काळ्या आईत राब राब राबून शेतीत जोरदार उत्पंन्न काढून जगाचा पोशिंदा ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.