निंबोल विजया बँकेतील गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

0

रावेर– तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर दि.१८ रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास भर दिवसा दरोड्याच्या इराद्याने आलेल्या अज्ञात दोन हेल्मेटधारी दरोडेखोरांनी बँक सहाय्यक व्यवस्थापक करनसिंग नेगी यांच्या छातीत गोळी झाडून ठार केले. त्यानंतर दुचाकीवरुन आलेले दरोडेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान घडलेल्या घटनेचा थरार बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लुट करण्याच्या प्रयत्नात असताना बँकेतील सायरन वाजविण्यासाठी बॅकेच्या सहाय्यक व्यवस्थापक करनसिंग नेगी यांनी टेबलावरुन उडी मारली. हा प्रकार लक्षात आल्यावर दरोडेखाराने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून नेगी यांच्या छातीत बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. यानंतर पकडले जावू या भितीने दरोडेखोर घटनास्थळाहून सोबत आणलेल्या शाईन या दुचाकीवरुन पसार झाले. दरम्यान, हा प्रकार दरोड्यासाठी झाला की काही वेगळे कारण आहे? याबाबत संभ्रम कायम आहे.

या सायरनचा आवाज ऐकताच मसाकाचे व्हाइस चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील, पंचायत समिती सदस्य जितू पाटील यांनी बँकेकडे धाव घेतली. त्यांनी तत्काळ जखमी बँक अधिकारी करण नेगे यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी निभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे त्यांनी पथकासह धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या आहे. अवघ्या काही मिनिटांतच घडलेल्या या थरारामुळे निंबोला येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपासासाठी रवाना केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.