नगरसेवक शेख कुर्बान यांच्याकडून गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

0

फैजपूर (प्रतिनिधी) : जगासह भारतातही कोरोना प्रादुर्भावाने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण देशासह महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्यात आले आहे. व एकीकडे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली असून येथील नगरसेवक शेख कुर्बान यांनी शहरातील ताहानगर, पठाणवाडी, इस्लामपूरा हजीरा मोहल्ला, मिल्लत नगर भागातील २०० गरजूंना प्रत्येकी ५०० रुपये व शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. व यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी घरीच राहून साजरी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच शहरातील गरजू नागरिकांना काही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य केले जाईल असे आश्वासन शेख कुर्बान यांनी दिले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक हेमराज चौधरी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.